पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येणा-या वर्धापन दिनी महापालिकेच्या नावलौकिकात भर घालणा-या स्थापनेपासूनच्या सर्व माजी नगरसेवकांना निमंत्रित करण्यात यावे. तसेच गतवर्षी प्रमाणे क्रीडा, कला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. अश्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी येणा-या मनपाच्या ३६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ई प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य सुरेश भोईर, अॅड. मोरेश्वर शेडगे, बाबु नायर, ज्ञानेश्वर थोरात, संदीप कस्पटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता प्रविण तुपे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, श्रीनिवास दांगट, संदीप खोत, स्मिता झगडे, आशा राऊत, विजय खोराटे, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, पराग मुंढे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, नितीन समगीर, मनोज माछरे, अंबर चिंचवडे, विशाल भुजबळ, शिवाजी येळवंडे, अनिल लखन, अतुल आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, वर्धापन दिनी पर्यावरणपूरक गणेशोस्तवासाठी उत्तम कामगिरी करणा-या स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या एका प्रतिनिधीस पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात यावे. तर स्वच्छता अभियान हे सर्व प्रभागात राबविण्यात यावे असेही त्यांनी सुचवले.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वच्छतेचे चांगले कामकाज करण्या-या कंत्राटी कामगाराचा गौरव करण्यात यावा असे सांगितले. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी आरोग्य विभगात चांगले काम करणा-या प्रत्येक प्रभागातील एक महिला व एक पुरुष आरोग्य कर्माच्या-यास सन्मानित करावे, अशी सूचना केली. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी वर्धापन दिनी सायकल रॅली आयोजित करण्याबाबत सूचना केली. तसेच शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्य सुरेश भोईर, बाबु नायर यांनीही वर्धापन दिनाबाबत विविध सूचना केल्या.
महापौर राहुल जाधव यांनी उपस्थितांच्या सुचनांचा विचार करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात जाईल असे सांगून आभार व्यक्त केले.