पिंपरी (Pclive7.com):- ‘जिद्द असेल तर मार्ग दिसेल’ हा मंत्र घेऊन उच्च शिक्षण झाले असतानाही पिंपरी चिंचवडमधल्या तरूणांनी चक्क चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. संकेत चौगुले आणि अक्षय राऊत असं एमसीए आणि एमबीए झालेल्या या तरूणांची नावे असून आकुर्डीतील महाविद्यालयात शिक्षण घेऊन त्यांनी रत्ना अमृततुल्य नावानं चहाचा व्यवसाय सुरू केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात संकेत रहातो. त्याने एमबीएचं शिक्षण पूर्ण केलयं. मराठी मुले व्यवसाय करत नाहीत असे म्हणतात. एमबीए आणि एमसीए सारखे शिक्षण झाले असेल तर नाहीच नाही. परंतू या दोन तरुणांनी त्याला छेद दिला आहे. या दोन तरुणांनी चक्क व्यवसाय सुरू केलाय तो ही चहाचा.. आणि महिन्याला तब्बल दोन ते अडीच लाख रूपये उत्पन्न मिळवत आहेत. रावेतमधील भोंडवे कॉर्नर येथे ‘रत्ना अमृततुल्य’ नावानं त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केलायं. मराठी माणूस व्यवसाय करायला घाबरतो अस म्हणतात….त्यात चहाचा व्यवसाय आणि ते ही एवढे शिक्षण असताना मग तर बोलायलाच नको…! पण लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि उत्तम चव आणि स्वच्छता, ग्राहकांशी सुसंवाद या जोरावर त्यांनी व्यवसाय चांगलाच बहरवलायं. महिना दोन ते अडीच लाख रुपये ते कमवत आहेत. व्यवसाय कोणताही असो त्याला कमी लेखण्याचे काहीच कारण नाही. सचोटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळतेच.. अक्षय आणि संकेत या उच्चशिक्षित तरूणांनी तेच दाखवून दिले आहे.