पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यालयाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या दि.११ ऑक्टोबर रोजी महापालिकेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा तसेच औद्योगिक क्षेत्रातील गौरविलेल्या उद्योजकांचा आणि गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे.
दरम्यान आज महापालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई रोडवरून जाताना ही विद्युत रोषणाई प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.





















Join Our Whatsapp Group