पुणे (Pclive7.com):- शबरीमालाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारण्यासाठी शिर्डीला निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
तृप्ती देसाई यांनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्याला भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती.





















Join Our Whatsapp Group