पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन, निर्मला कुटे सोशल फाऊंडेशन व कंम्प्लिट फिटनेस आणि स्पोर्ट्स कंपनी यांच्या सयुंक्त विद्यमाने आज “मिनी मॅरेथॉन २०१८” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या स्पर्धेला परिसरातील ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोकणे चौक ते नाशिक फाटा दरम्यान ३ किमी, ५ किमी, ८ किमी आणि ११ किमी अशा चार टप्प्यात ही स्पर्धा पार पडली. या “मिनी मॅरेथॉन २०१८” मध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट्स, प्रमाणपत्रे तसेच चारही टप्प्यात अनुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन पुरुष व तीन महिला विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल तसेच ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी पिंपळे सौदागर या स्मार्ट सिटीमध्ये प्रथमच आयोजन केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच मिळालेला प्रतिसाद बघता भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन देवांग, पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथ काटे, कर्मचारी महासंघ अध्यक्ष बबन झिंझुर्डे, पिंपरी चिंचवड महापालिका पतसंस्थेचे संचालक संजय कुटे, यशदा रियल्टी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे, उन्नती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व संस्थापक संजय भिसे, सागर काटे, शशी काटे, सामाजिक कार्यकर्त्या चंदा भिसे, नॅशनल बॉक्सर तृप्ती कदम, वेटलिफ्टर मनोजकुमार कवळे, समिर देवरे, योगेश मैंद, दिपक गांगुर्डे तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.






















Join Our Whatsapp Group