पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सामनाच्या अंकाची होळी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पिंपरी खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, सुलक्षणा शिलवंत, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक अरूण बोराडे, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हटले शिवसेनेने
अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू असून या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही, हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर सामनामधून टीका केली होती.





















Join Our Whatsapp Group