
पिंपरी (Pclive7.com):- संसदेत ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज जोरदार राजकीय वातावरण पाहायला मिळाले. भाजपच्या वतीने हा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

सभागृहात प्रवेश करताना भाजपच्या महिला नगरसेविकांनी काळ्या साड्या परिधान करून निषेध व्यक्त केला, तर इतर नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. “नारी शक्तीचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

भाजपच्या महिला नगरसेविकांनी यावेळी महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण असलेले हे विधेयक संसदेत नामंजूर होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे देशातील महिलांच्या हक्कांवर काँग्रेसने गदा आल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान आजची सर्वसाधारण सभा ५ मे २०२६ पर्यंत तहकूब करण्यात आली. सभा तहकूब झाल्यानंतर महापालिका प्रवेशद्वारावर भाजपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.




















Join Our Whatsapp Group