पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भोसरी येथील नवीन भोसरी हॉस्पिटल खाजगी तत्त्वावर देण्यास विरोध आधार सोशल फाऊंडेशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
मुख्यंमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नाविन्यपूर्ण इमारत त्यातील सर्व वस्तू यंत्रणा महापालिकेने खरेदी केली आहे. सुमारे १०० बेड चे सुपरस्पेशालिस्ट रुग्णालय तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना हे रुग्णालय पूर्ण यंत्रणा उपकरणासह खाजगी ठेकेदाराला चालवण्यासाठी वर्षाला २१ कोटी रुपये महापालिका देणार आहे. म्हणजे महानगपालिका हे रुग्णालय चालवण्यास असमर्थ आहे. सत्ताधाऱ्यांना घाबरून महापालिकेचे अधिकारी या रुग्णालयाचा खाजगी करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप विकास भुंबे यांनी केला आहे.
भोसरी सारखे १०० खाटांचे रुग्णालय महापालिकेने आपल्या हद्दीतील सर्व भागात उभारले पाहिजे. वायसीएम रुग्णालय सारखीच माफक दरांत वैद्यकीय सुविधा सर्वांना दिली पाहिजे. नागरिकांकडून कोट्यवधींचा कर दरवर्षी गोळा केला जातो. ज्यातून सर्व वैद्यकीय सुविधा सरकारी हॉस्पिटल्समधून मोफत व दर्जेदार मिळणे नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महापालिकेने भोसरीतील या नव्या रुग्णालयाचे खासगीकरण न करता स्वत: पालिकेने हे चालवावे, अशी मागणी आधार सोशल फाऊंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group