पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत अभिनेत्री आणि निवेदिका सरोज गणेश राव (वय ५४) यांचे काल बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. बुधवारी घरामध्ये टीवी पाहत असताना अचानक त्रास सुरु झाल्याने त्यांना तातडीने चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती गणेश राव, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सरोज राव यांचे आकस्मिक निधन





















Join Our Whatsapp Group