पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड परिसरात पाटेवरंवटे घडवत आपल्या मुलाला घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आईचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या जिद्दी राहूल धोत्रे या युवकाने चेस बॉक्सिंगमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. आता तो तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरणार आहे. त्याची आर्थिक गरज ओळखून पिंपरी युवासेनेच्या वतीने आज मदत करण्यात आली.
राहुलला तुर्की या देशात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. या सामन्यात जिंकण्याची त्याची जिद्द आहे. परंतू आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ही अपेक्षा मावळण्याची शक्यता होती. हे कळताच पिंपरी युवा सेनेच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश राहुलला आज मंगळवारी (दि. 5) दिला. राहुलला आणखी आर्थिक मदतीची गरज आहे. शक्य झाल्यास जरुर मदतीचा हात पुढे करावा, असे अवाहन युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खेळाडू राहुल चंद्रकांत धोत्रे (मो – 9767164139), फुगेवाडी दापोडी पुणे (पिंपरी-चिंचवड) 411012 बँक ऑफ महाराष्ट्र, दापोडी शाखेतील बचत खाते क्रमांक Ac – 20157313017,Ifsc – MAHB0000114 असून त्यांच्या यशस्वी कामगारीसाठी त्यांना स्वखुशीने आर्थिक मदत करावी, असेही आवाहन युवासेनेच्या वतीने केले आहे. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, मालिकार्जून हरळय्या, प्रभाकर हिंगे, चिंचापा निंगडोळे, सैदेश जमादार, नादा चंद्रन, सिद्धार्थ सुरवसे, मुजीब तांबोळी, कैलास फुगे, शैलेश हाके उपस्थित होते.