चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन येथील विकी वाईन्स शॉप मधून दारूसह तब्बल पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही चोरी शनिवारी (दि.२२) रात्री ते रविवारी (दि.२३) पहाटे या कालावधीत घडली. याप्रकरणी राहुल केमचंद दासानी (वय २९ रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्याने विकी वाईन्स या दुकानाच्या पाठीमागील बाजूचे बंद शटर व समोर लावलेली लोखंडी जाळी कशाच्या तरी साह्याने तोडून त्याने दुकानात प्रवेश केला. यावेळी चोराने दुकानातील देशी व विदेशी कंपनीच्या दारूच्या एक लाख रुपयांच्या बॉटल तसेच ९ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group