वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
पिंपरी (Pclive7.com):- वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष ऐश्वर्या बाबर यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. २० ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आमदार अमित गोरखे उपस्थित होते.

अल-निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गरजू नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे बाबर यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऐश्वर्या बाबर यांचे पती अमित बाबर यांच्या कुटुंबाचा पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ वारसा आहे. त्यांचे आई-वडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे चुलते स्व. गजानन बाबर यांनी खासदार आणि आमदार म्हणून काम केले आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या या आर्थिक योगदानाची शहरात चर्चा होण्याची शक्यता आहे.


















Join Our Whatsapp Group