पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा संघटनेतील शिस्त व अनुशासन अधिक बळकट करण्यासाठी शहर जिल्हा अनुशासन समितीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या समितीतील सदस्यांची नावे जाहीर केली.

पक्ष संघटनेचे काम सुरळीत चालावे, संघटनेचा योग्य विस्तार व्हावा आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी खोट्या बातम्या व प्रचाराला बळी न पडता पक्षाचे काम करावे, या उद्देशाने अनुशासन समिती स्थापन करण्यात आली आहे. पक्षांतर्गत शिस्त व अनुशासन ही भाजपची ओळख असून, ती अधिक बळकट करून संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.

या समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ विधिज्ञ, लोकप्रतिनिधी तसेच पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अनुशासन समितीचे सदस्य खालीलप्रमाणे :
सदाशिव दादासाहेब खाडे
आमदार उमा गिरीश खापरे
ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
ॲड. गोरखनाथ गेनबा झोळ
प्रशांत कृष्णराव शितोळे
विकास हरिश्चंद्र डोळस
या समितीच्या माध्यमातून पक्षांतर्गत शिस्त, संघटनात्मक समन्वय आणि पक्षाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

















Join Our Whatsapp Group