पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिध्द उद्योजक, युवानेते रामभाऊ वाकडकर पाटील यांचा वाढदिवस दि.९ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पध्दतीने त्यांनी वाढदिवस साजरा केला. रामभाऊ वाकडकर यांनी माण येथील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्राला सढळ हाताने मदत करत वाढदिवस साजरा केला.
यावेळी रामभाऊ वाकडकर, सुरज भुजबळ, विक्रम वाघमारे, शिवाजी जोरी, सोमनाथ लिमन, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
या अनाथ आश्रमातील अपंग विद्यार्थ्यांना व्हील चेअर, तसेच दैनंदिन जीवनात लागत असलेल्या आवश्यक वस्तू, धान्य व फळांचे वाटप रामभाऊ वाकडकर आणि मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले. अशा अनेक संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून रामभाऊ वाकडकर हे कायमच सढळ हाताने मदत करत असतात. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
रामभाऊ वाकडकर यांना वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, हाउसिंग फेडरेशनचे सर्व कार्यकारणी, विजय दर्शिले, संतोष पवार, संतोष कलाटे, विक्रम वाघमारे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.