पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच राज्य सरकरच्या या कार्याला अधिक बळ देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित मराठवाडा पतसंस्था पुढे आली आहे. या पतसंस्थेने ७५ हजार रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. हा धनादेश उपनिबंधक पुणे शहर -३ मा.शाहुराज हिरे, पंकज राऊत यांच्यकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी मराठवाडा पतसंस्थेचे अध्यक्ष दयानंद जेवळे, उपाध्यक्ष संजीवन माने, सचिव दत्तात्रय धोंडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. ज्योती भोसले, व विश्वेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवानंद तालीकोटी यावेळी उपस्थित होते.
मराडवाडा सहकारी पतसंस्था गेले ३२ वर्ष सामाजिक कार्य पिंपरी चिंचवड परीसरात करत आली आहे. दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम या पतसंस्थेच्या माध्ययमातून राबविले जातात. विद्यार्थी गुण गौरव सोहळा, वारकऱ्यांना फळे व खाद्यपदार्थ वाटप करणे, समाज परिवर्तनासाठी चांगले व्याख्यान आयोजन केले आहे. तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेने हासेगांव ताः औसा जिल्हा लातूर येथील एचआयव्हीग्रस्त एक अनाथ मुलगा दतक घेउन त्त्याचा पालनपोषणाचा व शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था करत आहे. कोविड-19 या महामारीचे जे संकट देशावर व राज्यवर कोसळले आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन, आपणही समाजाचे काही तरी देणे लागत आहे आणि आपण दिले पाहिजे. या मानवतेच्या दृष्टिकोनातून या मराठवाडा पतसंस्थेच्या माध्यमातून ७५ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला आहे.
यावेळी मराठवाडा पतसंस्थेचे अध्यक्ष दयानंद जेवळे म्हणाले की, देशावर व राज्यवर आलेल्या महामारीचे संकटातून आपण लवकरच बाहेर पडू. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करावी. नागरिकांनी घरातच थांबुन शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. अफवावर विश्वास न ठेवण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.






















Join Our Whatsapp Group