पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाला हरविण्यासाठी व कोवीड १९ वर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणाऱ्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व कोरोना रूग्णांवर रूग्णालयात उपचार करणाऱ्या महानगरपालिकेच्या डाॅक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांना ‘कोरोना वाॅरियर्स’ म्हणून बाॅम्बे इंजिनिअरींग ग्रूपचे प्रमुख स्टेशन कमांडंट ब्रिगेडीअर सेना मेडल एम.जे कुमार यांनी सैन्यदलाच्या वतीने केक कापून व मिठाई देवून त्यांच्या कार्याला सलाम केला व अभिनंदन केले.
महानगरपालिका भवनात आज येवून श्री कुमार यांच्या पथकाने आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ.के अनिल राॅय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ.पवन साळवे, वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे, डाॅ वर्षा डांगे, डाॅ. प्रविण सोनी, डाॅ. अनिकेत लाठी, डाॅ. लक्ष्मण गोफणे, डाॅ. शैला भावसार, डाॅ. जाॅन, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group