आज मंगळवार २९ डिसेंबर २०२० रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा १२ पैकी ८ राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
मेष: शुभ रंग : आकाशी : अंक : ७
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.
वृषभ: शुभ रंग : जांभळा : अंक : ९
नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता : अंक : ६
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.
कर्क : शुभ रंग : डाळिंबी : अंक : ८
आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.
सिंह : शुभ रंग : क्रिम : अंक : ४
अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उच्चशिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.
कन्या : शुभ रंग : हिरवा : अंक : २
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.
तूळ : शुभ रंग : राखाडी : अंक : ३
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.
वृश्चिक : शुभ रंग : मोतिया : अंक : ४
काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.
धनू : शुभ रंग : पांढरा : अंक : १
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईचे मन दुखाऊ नका.
मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी : अंक : १
आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.
कुंभ : शुभ रंग : गुलाबी : अंक : ५
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.
मीन : शुभ रंग : गुलाबी : अंक : २
तरुणांनी उध्दटपणास लगाम घालणे गरजेचे आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज तब्येत जराशी नरमच राहील.