आज सोमवार, दि.१५ फेब्रुवारी रोजी दिवसाची सुरुवात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये होत आहे. आज ग्रह आणि नक्षत्रांच्या परिस्थितीतून साध्य नावाचा योगग जुळून येत आहे.
मेष: शुभ रंग: पिस्ता : अंक : १
कौटुंबातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल.
वृषभ: शुभ रंग: पांढरा : अंक : ४
दैनंदीन कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणांत मात्र डोक्याला नुसता ताप होईल.
मिथुन : शुभ रंग : मरून : अंक : ८
आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.
कर्क : शुभ रंग : भगवा : अंक : २
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडेल. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.
सिंह :शुभ रंग : क्रिम : अंक : ७
सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येईल. डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा. क्लीष्ट कामेही सोपी होतील.
कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी : अंक : ९
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त पायपीट होईल.
तूळ : शुभ रंग : चंदेरी : अंक : ६
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील.
वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी : अंक : २
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
धनु : शुभ रंग : निळा : अंक : ३
कामधंद्यात आज काही अनपेक्षित अडचणी आल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आज एकांत हवासा वाटेल.
मकर : शुभ रंग : डाळिंबी : अंक : १
विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. आज स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही.
कुंभ : शुभ रंग : जांभळा : अंक : ५
वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.
मीन : शुभ रंग : आकाशी : अंक : ४
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. येणी वसूल होऊ शकतील.