पिंपरी (Pclive7.com):- डॉ. प्रिया अमित गोरखे यांना नुकतीच भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाकडून पी.एच.डी. (मॅनेजमेंट स्टडीज) पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. प्रिया अमित गोरखे यांनी B.A.M.A. नंतर M.B.A. पूर्ण केले. व त्यानंतर डॉ. अँथोनी रोज यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णलायमधील वैद्यकीय सेवांचा गुणवत्ता व्यवस्थापनाचा अभ्यास (A Study of Quality Management of medical services in Hospitals) या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध सादर केला.
पी.एच.डी. पूर्ण करताना पती अमित गोरखे व सासू नगरसेविका अनुराधा गोरखे यांचे सातत्याने प्रोत्साहन व मदतीमुळे यश प्राप्त करणे शक्य झाले. असे प्रतिपादन डॉ. प्रिया यांनी केले. त्या नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘स्कूल मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत.
नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने तसेच प्राचार्य वैभव फंड, नगरसेविका अनुराधा गोरखे, संचालक विलास जेऊरकर, अमित गोरखे व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.






















Join Our Whatsapp Group