पिंपरी (Pclive7.com):- कोविड-१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनापैकी नागरिकांचे कोविड-१९ लसीरकण करणे हा महत्वाचा घटक आहे. उद्या सोमवारी दि.१०/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरीक/लाभार्थींना आठ केंद्रावर कोविशिल्डचा पहिला डोस दिला जाणार आहे.
तर ४५ वर्षापुढील नागरिकांना तीन केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर ५६ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने ४५ वर्षावरील नागरीकांना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
● १८ ते ४४ वयोगटातील नागरीक/लाभार्थींना खालील केंद्रावर (प्रत्येक केंद्रावर २०० लाभार्थींना) कोविशिल्डचा पहिला डोस मिळणार
▪१. नविन भोसरी रुग्णालय – पहिला डोस – कोविशिल्ड लस
▪२. नविन जिजामाता रुग्णालय -पहिला डोस – कोविशिल्ड लस
▪३. प्रेमलोकपार्क दवाखाना – पहिला डोस – कोविशिल्ड लस
▪४. यमुनानगर रुग्णालय – पहिला डोस – कोव्हॅक्सिन लस
▪५. डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी – पहिला डोस – कोव्हॅक्सिन लस
▪६. पिंपळे निलख पी.सी.एम.सी स्कुल – पहिला डोस – कोव्हॅक्सिन लस
▪७. नवीन आकुर्डी रुग्णालय – पहिला डोस – कोव्हॅक्सिन लस
▪८. आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी – पहिला डोस – कोव्हॅक्सिन लस
● वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरीक/लाभार्थींना खालील केंद्रावर (प्रत्येक केंद्रावर १६० लाभार्थींना) कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस मिळणार
▪१. सावित्रीबाई फुले शाळा – भोसरी – दुसरा डोस – कोव्हॅक्सिन लस
▪२. नविन जिजामाता रुग्णालय – पिंपरी – दुसरा डोस – कोव्हॅक्सिन लस
▪३. तालेरा रुग्णालय – चिंचवड – दुसरा डोस – कोव्हॅक्सिन लस
● तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतर ५६ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने ४५ वर्षावरील नागरीकांना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्यात येणार आहे.
यासाठी नागरीकांनी/लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.
या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील आठही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे, तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.