पिंपरी (Pclive7.com):- विधानसभेतून विधानपरिषदेवर भाजपच्या कोट्यातून पाठविण्यासाठी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात उमेदवारी जाहीर केली आहे. अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे.