पिंपरी (Pclive7.com):- शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या (शुक्रवार दि.१४) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोव्हॅक्सिनचा’ दुसरा डोस २५० च्या क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत होणार आहे.
‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ या लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.
तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान आज (दि.१३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर ६६५६ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.