पिंपरी (Pclive7.com):- मोशी रिव्हर रेसिडेन्सी रिक्षा स्टँड येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरी चिंचवड शहर व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटना मोशीच्या वतीने रिक्षाचालकांना १०० मास्क आणि १०० सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक शाखा उपाध्यक्ष सुनील कदम, अमोल आल्हाट, अमोल सस्ते, पपू गवारे, आकाश भोर, तुषार आल्हाट, संजय आल्हाट, अक्षय गायकवाड, अनिल हरभरे, सर्व रिक्षा चालक मालक राजु जलनिला, अरविंद भाड, अंबदास जाधव, अजय गंधे, मनसे स्टार कामगार संघटनेचे सर्व युनिट प्रतिनिधी उपस्थित होते.