पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने स्व.पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या ३० व्या पुण्यतिथी निमित्त संत मोनीबाबा वृध्दाश्रम, वाल्हेकर वाडी चिंचवड येथे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
वस्तू संस्थेचे संचालक मन्नासिंग यांनी स्वीकारल्या. वस्तूंमध्ये संस्थेच्या मागणीनूसार मैदा, मसूर दाळ, मेथी दाणे, बिस्किटे, पीठ, ईलायची, हिंग, तेल, फिनायल, पिंताबरी पावडर आदि साहित्य देण्यात आले.
या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, राजीवजींनी माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे आज देशाची प्रगती व गतीमानता केवळ संगणक क्रांतीमुळे होताना दिसून येते. हिंजवडी येथील आय टी पार्कची निर्मिती स्व.राजीव गांधी यांच्या कार्यातूनच झाली व लाखो रोजगारांची निर्मिती त्यातून झाली व होत आहे. नव्या युगाचे नवे निर्माते राजीव चे ठरले व जागतिक स्पर्धेत भारतीची मान उंचावली गेली व भारताने प्रगतीचे नवे आयाम गाठले राजीवजींचे हे कार्य युवांना प्रेरित करणारे व काळाच्या गती व गरजांप्रमाणे नेतृत्वाचे कौशल्य दर्शविणारे आहे.
राजकारणातून देशप्रेमाचे व्रत घेऊनच ते वागले व भारताला एक तरूण पंतप्रधानाची कार्यपध्दती दर्शवत त्यांनी १८ वर्षापासून मतदानाचा हक्क बजाविण्याचा अधिकार युवांचा बहाल केला. पंचायत राज यंत्रणा सक्षमीकरण, राष्ट्रीय शिक्षण धोरण व दूरसंचार क्रांती या द्वारे राजीवजींनी देश समर्थ केला व देशासाठीच प्राण गमावले व राजीव जी अमर झाले, असे बनसोडे म्हणाले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कौस्तुभ नवले, पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल सरवदे, अनिल सोनकांबळे, मिलिंद बनसोडे, तेजस पाटील, रविराज मोरे आदि उपस्थित होते.