पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस दलातून वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोमवार दि.३१ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात पिंपरी चिंचवड पोलीस आस्थापनेवरील नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रदिप विश्वनाथ भक्त, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भिकाजी टोके, पोलीस उपनिरीक्षक दिलीप दत्तोबा अटोळे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम किसन लांडगे, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव निवृत्त पवार, सपोफौ देवदास दशरथ माळी, रखमाजी गजानन पोखरकर, अर्जुन किसन गायकवाड, विठ्ठल मारूती कुंभार, रघुनाथ बाळासाहेब पवार, वाल्मीक हिंन्दुराव अवघडे, सदाशिव देवराम क्षिरसागर, नवनाथ बारीकराव चौधर, सोपान शंकर राक्षे, पांडुरंग भिमाशंकर टाकळकर, लक्ष्मण आप्पासो शिंदे, जॉन जोसेफ शिंदे, मारूती आनंदराव कडु, सतिश शंकर बनकर, शंकर विण्णु माळी, प्रकाश निवृत्ती नलगे, रमेश शांताराम शिरोळे, विजयकुमार हरिश्चंद्र साळवी, पांडुरंग बाबु झोरे सर्व नेमणूक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रथमत: अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमीत्त उपस्थित शुभेच्छा सर्वांना व्यक्त करत सत्कारमुर्ती अधिकारी व अमंलदार यांना पोलीस दलात प्रमाणिकपणे आपले संपुर्ण योगदान दिल्याबद्दल कौतुक करून माणुस हा जन्माने नाहि तर कर्तुत्वाने महान होतो. तुम्ही निवृत्त झाले नाहित समाजामध्ये व पोलीस दलासाठी तुम्ही नेहमी पोलीसच राहणार आहात. पोलीस रात्री पहारा आणि दिवसा बंदोबस्त या भुमीकेत आपले कर्तव्य बजालच असतो पोलीस क्षत्रिय असून जनतेचे खरे रक्षणकर्ते आहेत त्यामुळे पोलीस दलात येवून कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाचीच बाब आहे. पोलीस आयुक्तलयात केव्हाही आपले स्वागतच असेल. कोरोना संसर्गाच्या कठीण काळात समाजासाठी आपण देलेले मोलाचे योगदान नक्कीच कौतूकास पात्र आहे. असे बोलून मुर्तीचे कौतुक करून पुढील वाटचालीस व भावी आयुष्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, (मुख्यालय) यांनी सर् सत्कारमुर्तीचे व त्यांचे कुटुंबियाचे स्वागत करून समाजाच्या रक्षणासाठी आपन दिलेले योगदान अत्यंत अभिमानाचे व कौतुकास पात्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वत:व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही सर्व सत्कारमुर्ती नेहमीच पोलीस परिवाराचा एक भाग राहणार आहात असे बोलून पुढील वाटचालीस व भावी आयुष्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. निरोप समारंभाचे सत्कारमुर्ती पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, दिलीप आटोळ, सदाशिव पवार, सतीष बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत पोलीस दलात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजन, प्रशासन किशोर म्हसवडे, प्रभावती गायकवाड, माया आभाळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस हवालदार दत्ता निकम यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजन, प्रशासन यांनी केले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचेसह पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे हे कार्यक्रमास उपस्थित राहुन सत्कार मुर्तींचे कौतुक करून पुढील वाटचालीस व भावी आयुष्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.