पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पिंपरी चिंचवड शहरासाठी नवीन लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. शहरातील हॉटेल दुपारी ४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार ५० टक्के सुरू राहतील. तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत जमाबंदी तर सायंकाळी ५ नंतर संचारबंदी असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी दिनांक ०७ जून २०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजल्यापासून खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ सरासरी पॉझिटीव्हीटी दर हा ५.८% असून ऑक्सिजन बेड ऑक्युपेन्सी १५.९१% आहे. त्या अनुषंगाने साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नवीन सुधारित आदेश जाहीर केले आहेत.
■ सुधारित आदेश खालील प्रमाणे
१) अत्यावश्यक सेवा (Essential Category) यामध्ये खालील सेवांचा समावेश असेल.
▪रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्रिनिक्स, लसीकरण (Vaccination), वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मासोज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा. त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरण युनिट (Supporting Manufactruring and Distribution Units) तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणा-या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा
▪पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने (Pet Shops)
▪वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणाशी संबंधित कामे
▪विमानसेवा व त्याच्याशी संबंधित सेवा Airlines, airports maintenance cargo. ground services, catering, fueling, security etc.)
▪किराणा (Groceries). भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थाची दुकान, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने
▪शीतगृह आणि गोदाम सेवा (Cold Storage and Warehousing)
▪सार्वजनिक वाहतूक टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा, सार्वजनिक बस
▪वेगवेगळ्या देशांचे राजदूत यांची कार्यालये
▪पूर्व पावसाळी नियोजित कामे
▪स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणा-या सार्वजनिक सेवा
▪रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणोन घोषित केलेल्या सेवा
▪सेबी तसेच सबोची कार्यालये व त्यांच्याशी संबंधित सेवा देणारी कार्यालये (Stock Exchange. Depostitories and Clearing Corporation and intermediaries registered with SEBI)
▪दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा.
▪मालवाहतूक
▪पाणीपुरवठा सेवा
▪कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा.
▪सर्व प्रकारचे आयात निर्यात
▪ई-कॉमर्स (अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी)
▪मान्यताप्राप्त मिडिया
▪पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणा-या सेवा (including offshore / onshore production)
▪सर्व प्रकारच्या कागों / कुरियर सेवा
▪डेटा सेंटर / काऊंड सर्व्हिसेस / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा.
▪शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
▪विद्युत व गॅस वितरण सेवा.
▪ATMs
▪पोस्टल सेवा
▪बंदरे (port) व त्यासंबंधित उपक्रम
▪कस्टम हाऊस एजंट, लस / औषध / जीवन रक्षक औषधांची संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
▪कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणा-या / पुरवठा करणार्या सेवा.
▪पावसाळ्याच्या हंगामाकरीता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणा-या सेवा
▪आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित अत्यावश्यक सेवा
२) सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा (Exemption Category)
अ) कार्यालये
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील कार्यालय सुरु राहतील..
▪केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये Including Statutory Authorities organisations)
▪को ऑपरेटीव्ह बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका
▪ अत्यावश्यक सेवा पुरवठा करणा-या कंपन्यांची कार्यालये
▪ विमा / मेडीकूम कंपनी
▪औषध उत्पादन करणा-या आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्यांच्याशी संबंधित कार्यालय.
▪रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था (Standalone Primary dealers. CCIL NPCI) पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि रिझर्व बँकेने नियमित केलेल्या बाजार पेठेतील कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागीसह घातक व मध्यस्थी
▪सर्व नॉन बैंकिंग वित्तीय महामंडळे.
▪सर्व मायक्रो फायनान्स संस्था
▪वकील, सी. ए. यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये,
३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
४) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त (Non- Essential Category) इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील, शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील
५) मॉल, सिनेमागृह (Single screen and multiplex) नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
६) रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. दुपारी ४.०० नंतर तसंच शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा (Home Delivery) रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहतील, प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेणे (take away) बंद राहील. सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इ. यांना दर्शनी भागावर बाहेरील बाजूस एकूण आसनक्षमता आणि ५०% प्रमाणे परवानगी असलेली आसन क्षमता यांचा बोर्ड लावणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे स्टीकर्स लावणे बंधनकारक असेल.
७) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा (Airport Services करणेस परवानगी राहील. बंदर सेवा (Port Services) यांच्या कर्मचा-यांना प्रवास
८) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
९) सूट देण्यात आलेल्या आस्थापना / सेवा (Exemption Category) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालय कामाचे दिवशी (Working Days) ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.
१०) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये (Goverment offices and Emergency services required for Covid 19 management ) १००% क्षमतेने सुरु राहतील. शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयांव्यतिरिक्त ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची परवानगी घ्यावी.
११) सर्व आउटडोअर स्पोर्ट (outdoor games) सर्व दिवशी सकाळी ०५.०० ते ०९.०० व सायंकाळी ०६.०० ते रात्री ०९.०० या वेळेत सुरु राहतील.
१२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात जथे चित्रीकरणाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी चित्रीकरण (Shooting) करण्यास परवानगी राहील. चित्रिकरणा संबंधित कर्मचा-यांना जवळच्या ठिकाणी हण्याची व्यवस्था असल्यास (Dedicated Colony) तसेच त्या ठिकाणाहून स्वतंत्र वाहनाने ने आण करण्याची व्यवस्था असल्यास चित्रीकरण करण्यास परवानगी असेल. मात्र सायंकाळी ०५.०० नंतर चित्रीकरणाच्या ठिकाणाहून बाहेर प्रवास करता येणार नाही.
१३) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत परवानगी राहील.
१४) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
१५) अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
१६) विविध बैठका, सभा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा General Body), निवडणुका या ५०% उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
१७) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे. असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास तसे बांधकाम दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ०४.०० वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.
१८) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्रो करणारे दुकाने/ गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
१९) ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
२०) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ०५.०० नंतर कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात येत आहे.
२१) व्यायामशाळा (Gym), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (by appointment) दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकुलन (AC) सुविधा वापरता येणार नाही.
२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने (without standing) सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेशी निगडीत व्यक्तीनाच त्यातून प्रवास करता येईल.
२३) माल वाहतूक करणा-या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्ती (चालक क्लीनर / मदतनीस) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.
२४) खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाव अंतराच्या रेल्वे मधून आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहनाने शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर e-pass असण बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणा-या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र e-pass आवश्यक राहील.
२५) निर्यातपुर्वक उद्योग / Export oriented units (including MSMEs that need to fulfill export obligation) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील.
२६) खालील उत्पादन क्षेत्र उद्योग नियमितपणे सुरु राहतील.अ) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग (Essential goods manufacturing units) –(अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारया उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणरे युनिट, त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह).ब) सतत प्रक्रिया करणारे उद्योग (All continuous process industries Unites that require) process that are of such a nature that these cannot be stopped immediately and cannot restart without considerable time requirement)क) राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्यासेग (Manufacturing of items that are significant to National Security and Defence)ड) Data Centers/Cloud Service providers/ IT Services supporting critical infrastructure and services.
२७) उपरोक्त मुद्दा क्र. २५ व २६ येथे नमूद केलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कर्मचारी ने-आण करण्यासाइ संबंधित उद्योगांनी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी. सदर कर्मचा-यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही.
२८) उपरोक्त आदेशामध्ये परवानगी देण्यात आलेल्या ज्या आस्थापना दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारो तसेच त्या ठिकाणावरुन सेवा घेणारे नागरिक यांनी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत त्यांचे घरी पोहचणे अपेक्षित आहे.
२९) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक ३० जून २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.▪इयत्ता १० वी व १२ वी ची परीक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे.▪परीक्षशी संबंधित सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मा. भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसोरकण कलेले असावे. अथवा ४८ तास वैधता असणार कोविड १९ निगेटिव्ह (RTPCR / RAT / TruNAT / CBNAAT) सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.▪महाराष्ट्राबाहेरील बोर्ड / विद्यापीठ / प्राधिकरण यांच्या परीक्षा घेणे अत्यावश्यक असल्यास संबंधित विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संमतीने परवानगी द्यावी.▪पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना / परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या परीक्षा / स्पर्धा परीक्षकरीता घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत / परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत संचारबंदीच्या काळात प्रवास करणेस परवानगी राहील. परीक्षार्थी सोबत त्यांची एक पालक यांना देखील प्रवास करणेस परवानगी राहील. मात्र परीक्षार्थीना प्रवास करताना सोबत परीक्षेचे हॉल तिकिट बाळगणे अनिवार्य आहे.▪सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.▪सर्व कर्मचा-यांनी मा भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसोरकण करुन घ्यावे.
३०) मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार घरपोच सुविधा (Home Delivery) सुरु राहील.
३१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील बाजारपेठांमध्ये एक दिवसाआड (Alternate day) सम विषम पद्धतीने रोज ५०% दुकानांना चालू ठेवण्यासाठी किंवा लोकहिताच्या दृष्टीने स्थानिक परिस्थितीप्रमाणे त्याहून जास्त बंधने (Restrictions) लावण्यासाठी संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना मी प्राधिकृत करीत आहे.
३२) सर्व दुकानमालक, कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी (RAT) प्रत्येक पंधरा दिवसांनी करण्यात येईल. स्थानिक क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय विभागाच्या मदतीने याची अंमलबजावणी करावी.
३३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक विक्रेते, व्यापारी, कामगार इत्यादी सर्व लोकांनी मास्क न वापरल्यास किंवा कोविड १९ प्रोटोकॉल विरोधी वर्तन केल्यास (उदा. थुंकणे, योग्य अंतर न पाळणे इत्यादी) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्येको १० भरारी पथकांची निर्मिती करण्यात यावी. कोविड १९ नियमांची कडक अंमलबजावणी करणेकामी क्षेत्रिय अधिकारी यांचे सुचनेनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी वेळोवेळी कारवाईत भाग घ्यावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित भरारी पथकातील कॉविड मार्शल / पोलीस यांना दंडात्मक कारवाई करणेकामी मी प्राधिकृत करीत आहे.
३४) सदरचे आदेश हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड १९ सरासरी पॉझिटिव्हीटी दर व ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सो यांचे टक्केवारीनुसार शासनाने निश्चित केलेल्या लेव्हल विचारात घेऊन केलेले आहेत. जर त्यामध्ये वाढ / कमी झाल्याचे आढळून आल्यास याबाबत आढावा घेऊन सुधारित आदेश निर्गमित केले जातील. संदर्भाय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहील.