पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील साई स्पोर्ट्स अकॅडमी स्केटरची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग इन टू व्हील ७५ तास नॉन स्टॉप स्केटिंगमध्ये साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या ९ खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या नावावर नवा विक्रम नोंदला आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड करणारे खेळाडू पुढील प्रमाणे..
एव्हलिन फर्नांडिस
जियांश निलेश गुंदेचा
अव्युक्त हर्षल बेहेरे
आरोही उमेश भुत्तेवाडकर
श्लोक आशीष अग्रवाल
कियंश मनोज सचदेव
जितेन मनोज सचदेव,
जिगर दिलीप ढोरमले,
संस्कार शहाजी गुंड.
या सर्व स्केटर्सचे साई स्पोर्ट अकॅडमीचे संचालक भूषण काटे, प्रशिक्षक शब्बीर शेख यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.