
भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंच्या हस्ते प्रकाशन
पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी चिखली परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरलेले मोफत महाआरोग्य शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळपासूनच नागरिकांनी शिबिर स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

दरम्यान यावेळी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याबाबत माहिती देताना यादव म्हणाले शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हाड व सांधे तपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी तसेच दंत तपासणी आदी विविध विभागांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत सेवा दिली. डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

या शिबिराच्या निमित्ताने दिनेश यादव यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, संतोष मोरे, साधनाताई मळेकर, आश्विनी जाधव, योगीता नागरगोजे विकास डोळस, तसेच मधुकर बच्चे,वैशाली खाडे आदी उपस्थित होते.

शत्रुघ्न काटे यांच्याकडून कौतुक..
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी दिनेश यादव यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता वाढत असल्याचे सांगितले. शिबिराचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली. शिबिरात शेकडो नागरिकांनी मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न..
दिनेश यादव यांनी या वेळी बोलताना सांगितले की नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.म्हणूनच आम्ही अशा उपक्रमांचे आयोजन करून आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

























Join Our Whatsapp Group