
पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन केले होते.

ह्या दीपस्तवाचे उद्घाटन कार्यक्षम नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व ब्राह्मण महासंघाचे मार्गदर्शक महेश कुलकर्णी व प्रदेशाचे उपाध्यक्ष पुष्कराजजी गोवर्धन यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे प्रास्तावना ब प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी केली. नगरसेविका आश्विनीताई चिंचवडे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. घरातील अमंगल व दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये आरोग्य व धनसंपदा लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या.

त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व सांगताना महेश कुलकर्णी यांनी सांगितले की त्रिपुरासुर नावाचा राक्षसाचा वध ह्याच दिवशी केला. म्हणून महिला भगिनी महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पुढे त्रिपुरी वात लावून महादेवाचे पूजन करतात. अंधाराचा नाश होऊ दे व दिव्याला दिवा लावून हे सृष्टी उजळून जाऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमाला शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी ब्रह्म उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष राजनजी बुडूख, प्रदेश सरचिटणीस दिलीपजी कुलकर्णी, प्रदेश चिटणीस संजयजी परळीकर, सचिव पवन वैद्य, सचिव सुषमाताई वैद्य, शहराचे कार्याध्यक्ष महेश बारसावडे, सरचिटणीस आनंद देशमुख, शामकांत कुलकर्णी, महिला अध्यक्ष संध्याताई कुलकर्णी, वैभव खरे,आरती ताई खोसे, वैशालीताई कुलकर्णी, कविताताई बारसावडे व महासंघाचे इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता आनंद देशमुख यांनी केली. सूत्रसंचालन शामकांत कुलकर्णी यांनी केले.

























Join Our Whatsapp Group