पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व पिंपरी चिंचवड शहराचे शहर संघटक सचिन सानप यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर कृष्णा नगर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या शिबिरामध्ये 93 लोकांनी रक्तदान केले. तसेच कृष्णा नगर परिसरामध्ये वृक्षारोपण आयोजन करण्यात आले होते. चिखली अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांना खाऊवाटप करण्यात आला. महात्मा फुलेनगर मधील गणपती मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सचिन सानप यांच्या अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय अल्हाट, नगरसेवक अमित गावडे, जिल्हा संघटक तुषार सहाणे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उद्योजक निलेश नेवाळे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, शैलेश मोरे कुणाल तापकीर, ज्येष्ठ नेते सर्जेराव भोसले, भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, दादा नरळे, भोसरी विधानसभा समन्वयक राहुल भोसले, ऋषिकेश जाधव, संतोष वाळके, युवा नेते राकेश वाकुर्डे, आशाताई भालेकर, अमित शिंदे, विभाग प्रमुख सतीश दिसले, सतीश मरळ, कुणाल तापकीर, नितीन बोंडे, राजू भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते आप्पा सायकर, प्रकाश मुंगुरवाडे, सोमनाथ सूर्यवंशी, लक्ष्मण देसाई, संभाजी बालघरे, गणेश भुजबळ, शिवानंद चौगुले, यशवंत कन्हेरे, सर्जेराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख प्रदीप सकपाळ, दीपक साळुंखे, राहुल ठाकरे, आकाश पाटील, अजिंक्य भोर, स्वप्निल शिरसाट, स्वप्निल काटे, अमित बिराजदार, स्वप्निल कांबळे, योगेश सानप, निखिल काटे, अरुण चव्हाण, अनुप लांबट, शैलेश शिंदे, अक्षय इंगळे, सोनू मुंडे सर्व मित्र परिवार व शिवसेना भोसरी विधानसभा प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व शिवसैनिक युवा सैनिक सर्व पदाधिकारी महिला आघाडी यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group