पिंपरी (Pclive7.com):- वाल्हेकरवाडी येथील शेतकरी व वारकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मधुकर शिवले यांचे बुधवार दि.१५/९/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
वाल्हेकरवाडी येथील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा आवर्जून सहभाग असायचा.
हभप नंदकुमार शिवले, उद्योजक भरत शिवले यांचे ते बंधु होत. मयूर शिवले व अक्षय शिवले यांचे ते वडील होत. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी, दोन मुले, पाच भाऊ असा मोठा परिवार आहे.