शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांचा यशस्वी पाठपुरावा
भोसरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते खासदार निधीतून तळवडे-रुपीनगर प्रभागात विविध विकासकामे केली जाणार आहेत. या विकासकामांचे खासदार कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी भूमीपूजन करण्यात आले. तळवडे-रूपीनगर प्रभागात खासदार निधीतून कामे व्हावीत यासाठी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी पाठपुरावा केला होता.
तळवडे-रुपीनगर प्रभागातील नवीन रस्त्याच्या विकास कामासंदर्भात शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी तेथील विविध रस्त्यांच्या विकासासाठी खासदार निधी मंजूर करून घेतला.
या विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतर धनंजय भालेकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रेडझोनचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावतोय, हा प्रश्न सुटणे अत्यंत गरजेचे आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी शास्तीकर तसेच रेडझोन संदर्भात आपण शासन स्थरावर पाठपुरावा करीत आहोत, लवकरच याचा निर्णय होईल असे आश्वासन कोल्हे यांनी दिले.
यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक जालिंदर बापु शिंदे, युवा नेते विराज लांडे, पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट, दीपक साकोरे, उद्योजक रमेश कुमार परमार, सूर्यकांत भसे सर, सुधाकर दळवी, विलास तात्या भालेकर, शरद भालेकर, अमोल भालेकर, बाजीराव भालेराव, समीर मुल्ला, जावेद पठाण, तसेच पांडुरंग हौसिंग सोसायटी शिवरत्न हौसिंग सोसायटी गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.