पिंपरी (Pclive7.com):- उद्योगनगरीतील तरुण तडफदार उद्योजक व वाकड भागातील सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील उभरते नेतृत्व असलेले युवानेते संतोष गुलाबराव कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्य वाढविण्याकरिता व कलाटे यांच्या समाजकारण व पक्षाकरिता केलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर नियुक्ती प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ आमदार लक्ष्मण जगताप व पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी उपस्थित होते.