पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज (मंगळवार दि.११) दिवसभरात तब्बल १,७०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३८७ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला असून आज एका रूग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात १,७०६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३८७ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८०१३ इतकी झाली आहे. यातील ४०३ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ७६१० रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
🚨 Pcmc Corona Update’s🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
मंगळवार दि.११ जानेवारी २०२२
📲अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = १७०६
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ००
📉 एकूण पॉझिटिव्ह = २८७९१९
📉 सध्या शहरात रूग्ण = ८०१३
(रूग्णालय ४०३ + क्वारंटाईन ७६१०)
📉 एकूण मृत = ४५२७ (आज = ०१)(०० Pcmc, ०१ हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २७६११० (आज ३८७ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = ८७७४
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = ३६८१
💉 आज लसीकरण = १७५३६
(एकूण = ३११२७९६)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group






















Join Our Whatsapp Group