पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्यावतीने शहर युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुणे जिल्हाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर प्रभारी सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक आघाडीची शहर जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/01/APSARA-CAMPAIGN-1-2-1024x1024.jpg)
महासचिव बाळासाहेब भागवत, राज्य महिला सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुधाकर वारभुवन, उपाध्यक्ष के. एम. बुक्तार, वरिष्ठ उपाध्यक्ष विलास गरड, संपर्क प्रमुख राजू उबाळे, कामगार नेते विनोद चांदमारे, लिंबराज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदनियुक्ती सोहळा पार पडला.
शहर उपाध्यक्ष -शाहरूख खान, अमोल वारभुवन, आनंद गायकवाड, शहर कार्याध्यक्ष यशवंत सूर्यवंशी, शहर प्रसिद्धी प्रमुख अनिल तांगडे, शहर चिटणीस- रजनीकांत वाव्हळकर, केतन कांबळे, शहर संघटक आकाश सोनवणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष- स्वप्निल कसबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष- करण पिटेकर, शहरउपाध्यक्ष अतुल जाधव, पिंपरी विधानसभा अध्यक्ष संदीप तोरणे, उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा सूरज वायदंडे, संघटक चिंचवड विधानसभा सूरज देढे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.