पिंपरी (Pclive7.com):- शहर सुधारण समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांच्या पुढाकारातून मोरवाडी चिंचवड प्रभाग क्रमांक १० मधील एम्पायर स्क्वेअर गृहनिर्माण सोसायटी मधील जेष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात आला. तर, १५ ते १८ या वयोगटातील मुलांनाचेही लसीकरण करण्यात आले.

नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी या लसीकरण कॅम्पचे आयोजन केले होते. त्यांच्या व भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या हस्ते फीत कापून शिबिर चालू केले. त्यास नागरिकांचा व तरुणांचा मोठा सहभाग लाभला. वायसीएम हॉस्पिटलच्या मदतीने हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते.
डॉ. अमिता भट्टड, नर्स जयश्री मिडगुले, करुणा समुद्रे, प्रणाली तेलगोटे, वैष्णवी सरोदे, अलका भणगे, एम्पायर स्क्वेअर जेष्ठ नागरिक संघातर्फे प्रा. सदानंद बोगम, सुवालाल मुथ्था, नेमिचंद जैन, सुशीलकुमार गोयल, विजय गुप्ता, प्रदीप तळेकर, विलायतीराम आगरवाल, रामकुमार आगरवाल, शंभूशेठ तोडी, जगन्नाथ तरटे, तुकाराम शेळके, मधुकर जोशी, अतुल शहा, शेखर घेवारे, विनीत कदम, अजय लड्डा, सुशीलकुमार गोएल व इतर सर्व जेष्ठ नागरिकांनी लसीकरण मोहिम यशस्वी पार पडण्यासाठी काम केले.
























Join Our Whatsapp Group