पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडगावातील चापेकर चौकात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचे म्युरल बसविण्यात आले आहे. या म्युरलच्या समोर चापेकर यांचे भव्य स्मारक असून त्याच्यासमोर नव्याने बसविण्यात आलेले म्युरल तुलनात्मक अतिशय छोटे आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमात जिजाऊ यांचे कतृत्व हिमालयापेक्षाही मोठे आहेत. त्यामुळे त्यांना साजेसे असे स्मारक उभारणे चिंचवडगावात उभारणे आवश्यक होते. परंतु एकीकडे क्रांतीवीर चापेकर यांचे भव्य स्मारक असताना त्याच्या समोर अवमान होईल असे म्युरल बसविण्यात आले आहेत. याशिवाय हे कामही निकृष्ट दर्जाचे आहे.

यालगत रहदारीचा रस्ता आहे, जवळून जाणाऱ्या नागरिकांकडून धूम्रपान करून म्युरलचा अवमान होणार नाही, याची काळजी सत्ताधारी भाजप आणि महापालिका यांनी घेतली नाही. याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा नेमणूक करावी. अथवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अॅड. संदीप चिंचवडे यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी महापौर माई ढोरे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित होते. भाजपने केलेल्या विकासकामांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्षेप घेऊ लागल्याने आगामी काळात विकासकामांवरून शीतयुद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
























Join Our Whatsapp Group