पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात सहभागी होतात, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात येते.

यावर्षी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जयंती व प्रबोधन पर्व साजरे करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी शहराती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीस संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group