चिंचवड (Pclive7.com):- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व तिरंगा ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताने झाली. यानंतर फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे व महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले.

फाउंडेशनच्या वतीने उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सैनिक हा देशाचा अभिमान असून माजी सैनिक निवृत्तीनंतरही समाजासाठी जे सामाजिक कार्य करतात, त्यांच्याबद्दल समाजाने कायम आदर, आपुलकी व अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन केले. माजी सैनिकांच्या कर्तृत्वाचा व शिस्तीचा समाजाला निश्चितच फायदा होतो, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करत देशसेवेतील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम सय्यद यांनी केले, तर सूत्रसंचालन सहसचिव मंगला डोळे–सपकाळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे–सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी, सलीम सय्यद, संस्थापक क्रांती कुमार कडूलकर, दारासिंह मन्हास, जावेद शेख, नंदकुमार वाडेकर, लता शिंदे, मेघना बेरी, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, सरिता कुलकर्णी, ओम सोनी, उदय कुलकर्णी, रोहिणी बच्चे, हनीफ सय्यद, अनिल पोरे, अनिल शिंदे, भावीन भंडारी, श्रावणी बच्चे, निलेश आकारे, शंकर कुलकर्णी, आसावरी बच्चे, विलास गटने, अशोक देशपांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी फाउंडेशनचे सल्लागार खुशाल दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
























Join Our Whatsapp Group