पुणे (Pclive7.com):- पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलीस यंत्रणांनाही घटनेमुळं धक्का बसला आहे. पुण्यातील वाघोली इथं आईच्या हातून एक धक्कादायक कृत्य घडलं आहे, आईने ११ वर्षांच्या मुलाचा खून केला असून, आईने १३ वर्षाच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला आहे.

पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याच घटनेत १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, सुदैवाने ती मुलगी बचावली आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय (मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेड) सध्या वाघोली येथे बायफ रोडवर वास्तव्यास असलेल्या या महिलेने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ११ वर्षांचा मुलगा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला. तर १३ वर्षांची मुलगी धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






















Join Our Whatsapp Group