पिंपरी (Pclive7.com):- लाडशाखीय वाणी समाज महिला विकास मंडळाच्या वतीने चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त व आनंददायी प्रतिसाद लाभला. परंपरा, स्नेह आणि संस्कृती यांचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमात सुमारे ६०० महिलांनी सहभाग नोंदवला.

हळदी-कुंकू समारंभासोबतच खेळ पैठणीचा, आपुलकीचे संवाद आणि सौहार्दाचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्नतेने भारून गेला होता. महिलांच्या एकतेचा, सशक्तीकरणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात खेळ पैठणीच्या सुप्रसिद्ध निवेदिका सौ.वसुंधरा गोडसे यांच्या माध्यमातून विविध मनोरंजक खेळ, उखाणे घेण्यात आले. विजयी महिलांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. पैठणी विजयाचा मान सौ. सविता सागर वाणी (काळेवाडी) आणि सौ. सारिका सचिन शिरोडकर (रावेत) यांनी पटकाविला. उपस्थित सर्व महिलांनी अशा उपक्रमांचे मनापासून स्वागत करत भविष्यातही असे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“हळदी-कुंकू म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर महिलांच्या मनातील स्नेह, एकता आणि शक्तीचा उत्सव आहे,” असे मत व्यक्त करत भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका अनिता ताई काटे, कुंदाताई भिसे, अर्चनाताई तापकीर, स्वप्ना शत्रुघ्न काटे, महिला अध्यक्ष प्रिती ताई कोठावदे, चंँलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीपजी काटे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोजजी ब्राम्हणकार यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर महिलांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला तसेच आकर्षक भेटवस्तूंचे सौभाग्यवतींना वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगिता फुलदेवरे, माधुरी ततार, सोनाली बधान , माधुरी वाणी, स्वाती अमृतकार, अर्चना ब्राह्मणकार, संगिता लाड, माधुरी शिरुडे, कुंदा पाटे, कल्पना बहाळकर, योगिता ब्राम्हणकर, सुवर्णा फुलदेवरे, शितल शिनकर, वृषाली बोरसे, निता शिनकर तसेच उपस्थित महिलांचे विशेष सहकार्य लाभले. याबद्दल वैशाली सोनकुळ यांनी सर्वांचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group