खोपोली (Pclive7.com):- रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी होऊन महामार्गावर २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झालीय.

केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गिकांपैकी एका मार्गिकेवर टँकर पलटी झाल्याने ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. आय. आर. बी. यंत्रणा, बोरघाट वाहतुक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलीसांनी मदत कार्य सुरू केले आहे.






















Join Our Whatsapp Group