पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील अखिल भारतीय कबड्डी पंच स्व. बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी क्रीडांगणाची पाहणी करून माहिती देखील घेतली.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220518-WA0000-300x300.jpg)
क्रीडांगणात मिनी फुटबॉल मैदान, क्रिकेट पिच, मैदानाभोवती चालण्याचा पथ आणि टेनिस कोर्ट तयार करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कक्ष व स्टेडियम पद्धतीची बैठक आदी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2022/05/IMG-20220526-WA0028-300x206.jpg)
अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे 88 चौकाकरीता 297 सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहे. मनपाने 2 हजार 200 कॅमेरे तर स्मार्ट सिटी अंतर्गत 430 चौकाकरीता 2093 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मनपा क्षेत्रात 7 हजार 600 कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत.