पिंपरी (Pclive7.com):- आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे मेट्रो, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN), लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने फुगेवाडी मेट्रो स्थानकात लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पनाआहे, ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डॉ. के. सत्या लक्ष्मी, संचालक, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आणि श्री पी. एम. पार्लेवार, संचालक, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सकाळी ६ वाजता पुणे मेट्रोच्या फुगेवाडी स्थानकात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे श्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करून योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा येथील कर्मचाऱ्यांनी योगा गाण्यांचे थेट सादरीकरण केले.
माननीय पंतप्रधानांनी म्हैसूर, कर्नाटक येथून राष्ट्राला संबोधित केले, त्यानंतर देशभरात योग सत्र सुरु झाले. फुगेवाडी मेट्रो स्थानकावर झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात ५०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. NIN मधील २५ व्यावसायिक प्रशिक्षित योग प्रशिक्षकांद्वारे योग प्रात्यक्षिकांचे पर्यवेक्षण करण्यात आले. फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरावर योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आयुष मंत्रालय, सरकार यांनी योग सत्रे करण्यासाठी भारतातील ७५ प्रतिष्ठित स्थाने निवडली होती. आठव्या आंतरराष्ट्रीय योग 2022 च्या निमित्ताने, पुणे मेट्रोचे फुगेवाडी मेट्रो स्टेशन हे एकमेव स्थानक या दुर्मिळ प्रसंगासाठी निवडले गेले आहे. असा आगळावेगळा कार्यक्रम होणारे हे एक आगळेवेगळे ठिकाण होते. योगासनामध्ये पुणे-पिंपरी चिंचवडमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
योग सत्रानंतर माननीय श्री नारायण राणे यांनी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयाला भेट देऊन पुणे मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी श्री नारायण राणे म्हणाले, “पुणे मेट्रो पुणेकर नागरिकांना उत्तम वाहतूक सुविधा देत आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचे नियोजन उत्कृष्ट आहे. पुणे मेट्रोने भाडे उत्पन्नाव्यतिरिक्त विविध गैर-भाडे महसूल मार्ग ओळखले आहेत, यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि पुण्यातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करेल.