पिंपरी (Pclive7.com):- हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडून देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले.
शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, दत्ता वाघेरे, माजी नगरसेविका उषा वाघेरे, माजी नगरसदस्य संदीप वाघेरे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.