पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना रिपब्लिकन जनशक्ती पार्टीचा पाठींबा देण्यात आला आहे.

या संदर्भात रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. रिपब्लिकन जनशक्ती पक्षाची भूमिका महविकास आघाडी व इंडिया आघाडी याच्या विचारधारेबरोबर असून भारतीय संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पार्टीचे पक्ष अध्यक्ष ज्येष्ठ साहित्य, विचारवंत अर्जुनराव डांगळे आणि प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशाने आम्ही मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पूर्णपणे पाठींबा जाहीर करीत आहोत, असे स्पष्ट केले आहे.
पक्षाचे पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष माऊली उर्फ किसन भोसले यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन ही केले आहे. पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष आनेश भोसले, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा कुसुम कदम, संघटक अनिल पवार, शुभम शिंदे, आदित्य काळे यांनीही पाठिंबा देत त्यांच्या विजयी करण्याचे आवाहन केले आहे.


























Join Our Whatsapp Group