पिंपरी (Pclive7.com):- १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणजेच श्रमिक दिन म्हणून जगातील ८० देशांमध्ये कामगार दिन म्हणून पाळला जातो. कामगार दिनानिमित्त लाल झेंडा हा प्रतिक म्हणून वापरण्यात आला आहे. १ मे ला कामगार दिनाबरोरच महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जातो. आजही कामगारांच्या बऱ्याचशा संघटना मालक शाहीच्या दावणीला बांधलेल्या आहेत. तर फारच थोड्या कामगार संघटना प्रामाणिकपणे काम करतांना दिसतात. कामगार देशोधडीला लागला आहे. सर्व कायदे उद्योग धार्जिने झाल्याची खंत आण्णा जोगदंड यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील बरेच उद्योग गुजरात व इतर राज्यात गेल्याने तरुणाच्या हाताला काम राहिलेले नाही.
सुरेश कंक म्हणाले की, स्पर्धेच्या युगात कामगारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे काळानुसार स्वतःमध्ये बदल करावेत. कामगारांचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे माहेर आहे. त्या ठिकाणी वारंवार विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
कामगार नेते अरूण बोराडे की, सध्या दहा ते वीस वर्षापासून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात महाराष्ट्रात कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करताना दिसतात. त्यांना शासनाने सेवेत सामावून घेतले पाहिजे, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठान दिली पाहिजे, सध्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यामध्ये उद्योजकांनी विश्वासार्हता निर्माण करून कामावर राष्ट्रभक्ती रुजवली पाहिजे असे मत बोराडे यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवाजीराव शिर्के ज्येष्ठ पत्रकार म्हणाले की, कामगारांनी संत कबीर यांनी सांगितल्याप्रमाणे कल करे सो, आज कर, और आज करे सो अभि कर असे काम कामगारांनी केले पाहिजे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते त्या आनंदाने स्वीकारले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रमुख पाहूणे आण्णा जोगदंड, कामगार नेते अरूण बोराडे, गुणवंत कामगार संगिता जोगदंड ,जेष्ट पत्रकार शिवाजीराव शिर्के, शामराव सरकाळे, अमित निंबाळकर, सुभाष चव्हाण, आण्णा गुरव, प्रकाश घोरपडे, शंकर नानेकर, पंकज पाटील, गोरख वाघमारे, सुरेखा मोरे, संगिता क्षिरसागर, किरण कोळेकर, दिनकर पाटील, आनंद निकम, विकास कोरे, बाळासाहेब साळुंके, ह.भ.प शामराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group