पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका १२ मार्च २०२२ रोजी बरखास्त झाली आहे. प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजित केली आहे. त्या सभेसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय कार्यालयात बदल करत खांदेपालट करण्यात आली आहे.
उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे ‘ग’ ऐवजी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय दिले आहे. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे ‘फ’ ऐवजी ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे. सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे ‘ह’ ऐवजी ‘क’ क्षेत्रीय कार्यालय सभेचे कामकाज दिले आहे.
सहशहर अभियंता सतीश इंगळे यांच्याकडे ‘ई’ ऐवजी ‘ड’ कार्यालय दिले आहे. सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे ‘अ’ ऐवजी ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे. शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे ‘ब’ ऐवजी ‘फ’ कार्यालय दिले आहे.
त्यासोबतच आत सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याकडे ‘क’ ऐवजी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय आणि उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे ‘ड’ ऐवजी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देत खांदेपालट करण्यात आली आहे.