पिंपळे गुरव (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पुरूषांनी सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी केली. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने २०१६ पासून वटसावित्री पौर्णिमा सातत्याने साजरी केली जाते. महाराष्ट्रात पुरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे. प्रत्येक महिला वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून दीर्घ आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे. म्हणून आम्ही सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून सात फेरे मारल्याचे उपस्थित पुरूषांनी सांगितले.
विकास कुचेकर म्हणाले की, महिलांनी वटवृक्षाची फाद्यी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आव्हान केले. अरूण पवार म्हणाले कि, कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले होते. याचे गांभीर्य ओळखून वृक्ष लागवड केली पाहिजे, आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची सोय असे ते म्हणाले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की, उच्च शिक्षित स्त्री व पुरुषामध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा समानतेच्या जनजागृतीच्या उपक्रमामुळे त्यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. नऊ वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा आयोजकाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की, पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत. पुरूषप्रधान देशात महिला पण पूरूषांच्या खांद्याला खांदा देऊन खुरपणी पासुन ते नासापर्यत प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोचल्या आहेत. तरीही त्या पतीला दिर्घ आयुष्य मिळावे म्हणून 150 वर्षे आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सात फेरे प्रदिक्षणा घालतात मनोभावे पुजा करतात. मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे व सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये. म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून, सनई, वाद्य वाजवून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले असे आयोजक व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या की, आमच्यासाठी पुरूषांनी सात फेऱ्या मारुन आमच्यासाठी दिर्घ आयुष्य मागितले. यामुळे खूपच आनंद झाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरुष वटपौर्णिमा साजरी केल्याने आम्ही सर्व महीला आनंदी झालो आहोत.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कामगार कल्याण उपायुक्त मनोज पाटील, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा मिना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, जेष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंडे, गुणवंत कामगार काळुराम लांडगे, कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, अमोल लोंढे, विकास शहाणे, सुरेश कंक, प्रकाश बंडेवार, राजेंद्र गोराने, आरोग्य मुकादम, विजय कांबळे, लक्ष्मण जोगदंड, जाई जोगदंड, रमेश थोरात, प्रदिप बोरसे, जालिंदर दाते, शंकर नानेकर, शामराव सरकाळे, प्रकाश सावंत, सचिन करंजावणे, इंद्रजित चव्हाण, सारंगी करंजावणे आदी उपस्थित होते.