पिंपरी (Pclive7.com):- महिलांचा अपमान करणाऱ्या विरोधकांविरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मोरवाडी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘नारी-शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) विरोध करणाऱ्या काँग्रेस व इंडी आघाडीतील पक्षांविरोधात संताप व्यक्त करत हे जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाला विरोध केल्याने देशभरात महिलांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. महिलांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने मोरवाडी येथे मोठ्या उत्साहात आंदोलन पार पडले.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला कार्यकर्त्या आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांनी महिलांविरोधी मानसिकता दाखवली असून, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
“देशातील नारीशक्तीचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. महिला आरक्षणाला अडथळे निर्माण करणारे पक्ष संपूर्ण स्त्रीशक्तीचा अपमान करत आहेत. हा अपमान भाजप कधीही सहन करणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलनादरम्यान मांडण्यात आली.

या आंदोलनात युवक अध्यक्ष दिनेश यादव, महिला अध्यक्षा सुजाता पालांडे, अजित कुलथे, दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, राहुल खाडे, साची दोषी, रवी जांभुळकर, मयूर काळभोर, देवयानी भिंगरकर, दयानंद बंडगर, प्रदीप नाईक, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, आदम मुलानी, योगिता जाधव, अर्चना शेंडगे, स्वाती वाघमारे, सुनीता शिंग, शिल्पा शिंग, तनया चरखे, कोमल गाडगीरे, प्रतीक्षा देशमुख, भक्ती जकताबा यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






















Join Our Whatsapp Group